Popular Prakashan Pvt Ltd
Kalidasache Meghdoot
Product Code:
9788171850051
ISBN13:
9788171850051
Condition:
New
$15.61
Kalidasache Meghdoot
$15.61
"एखाद्या निर्जन बेटावर जाताना एकच काव्य बरोबर नेण्याचे जर माझ्यावर बंधन घालण्यात आले तर मी 'मेघदूत' या काव्याचीच निवड करीन असे मला वाटते. मेघदूतापेक्षा अधिक श्रेष्ठ दर्जाची काव्ये जागतिक वाङ्मयात उपलब्ध नसतील असे अर्थात मला म्हणायचे नाही. शिवाच्या मंदिरात शिव आणि केशवाच्या मंदिरात केशव हाच देवाधिदेव, असा प्रकार साहित्याच्या प्रांतास तरी करावयाचे काहीच कारण नाही. परंतु रसिकाच्या मनाला अथपासून इतिपर्यंत मंत्रमुग्ध करण्याचे, एक वेगळे भावविश्व त्याच्या सभोवार विणून त्याला उन्मनावस्थेत पोहोचविण्याचे सामर्थ्य मेघदूतात जितके आहे तितके अन्यत्र आढळणे फार कठीण आहे... ... सर्व निष्ठा कायम राखून, सौंदर्यबुद्धी आणि रसिकता जागी ठेवून, ऐहिक संसाराचा पुरेपूर आस्वाद घेणाऱ्या प्रवृत्तींतून या दीर्घ भावकाव्याचा जन्म झाला आहे. कालिदासाच्या प्रतिभेचे सर्वोच्च स्वरूप या काव्यात दिसते की नाही यासंबंधी वाद होऊ शकेल, परंतु त्याच्या रसिकतेचे आणि विविध सौंदर्याचा आस्वाद घेण्याच्या सामर्थ्याचे सर्वोत्कृष्ट स्वरूप या काव्यात व्यक्त झाले आहे, हे मला वाटते सर्वांनाच मान्य करावे लागेल." वि. वा. शिरवाडकर 'प्रतिसाद ' या प
| Author: Kusumagraj |
| Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
| Publication Date: Jan 01, 1956 |
| Number of Pages: 72 pages |
| Binding: Paperback or Softback |
| ISBN-10: 8171850057 |
| ISBN-13: 9788171850051 |