Popular Prakashan Pvt Ltd
Jarila
Product Code:
9788171852321
ISBN13:
9788171852321
Condition:
New
$24.80
Jarila
$24.80
'जरीला ही कादंबरी पडत जाणाऱ्या, आत्मशोधन करणाऱ्या, जगण्याची धडपड करणाऱ्या, जगणे म्हणजे शिक्षा वाटणाऱ्या, छोट्या छोट्या गोष्टींसाठी रक्त आटविणाऱ्या, संवेदनशील तरुण मनाचा प्रभावी आविष्कार आहे. 'जरीला' कादंबरी एकाच वेळी समाजाची व तरुण पिढीची विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी आहे. अधू समाजाची आणि जन्मतःच अधू हृदय घेऊन जन्माला आलेल्या पिढीची अस्वस्थ करणारी ही शोकांतिकाच आहे. पण ती शोकांतिका रूढ तंत्रातून भावात नाही. 'जरीला' कादंबरीतील अनुभवविश्व व त्याचा आविष्कार करणारे प्रसंग मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हे प्रसंग रूढ अर्थाने अतिशय सामान्य, साधे, नित्य जीवनातले, कलाकृतीच्या संदर्भात कालामूल्य कमी जाणवणारे असे आहेत. सरपटणाऱ्या जीवनाचा संथ आणि मंद आवेग शब्दांकित करण्याची भूमिका असलेल्या लेखकाने अतिशय सामान्य प्रसंग चित्रित केले आहेत. पण वैशिष्ट्य असे की, त्यांच्या पोटातील जीवनदर्शनाची अमाप शक्ती प्रकट करून त्यांना अर्थपूर्ण बनविले आहे. कोणताही अनुभव अतिसामान्य नसतो, त्यालाही जीवनाच्या आविष्कारात अर्थ व संदर्भ असू शकतो. असा त्या त्या प्रसंगातील अर्थ उलगडून त्या प्रसंगाची श्रीमंती प्रकट केलेली आ
| Author: Bhalchandra Nemade |
| Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
| Publication Date: Jul 02, 2022 |
| Number of Pages: 306 pages |
| Binding: Paperback or Softback |
| ISBN-10: 8171852327 |
| ISBN-13: 9788171852321 |