
Popular Prakashan Pvt Ltd
Dr. Rukhmabai: Ek Aarta
Product Code:
9788171852796
ISBN13:
9788171852796
Condition:
New
$22.97

Dr. Rukhmabai: Ek Aarta
$22.97
ज्या काळात स्त्रिया नुकत्याच कोठे शिक्षण घेऊ लागल्या होत्या त्या काळात, परदेशी जाऊन डॉक्टरीविद्या संपादन करणाऱ्या दोन महाराष्ट्रीय स्त्रियांपैकी एक डॉ. आनंदीबाई जोशी व दुसऱ्या डॉ. रखमाबाई सावे आणि पेशा म्हणून डॉक्टरी व्यवसायाचा अंगिकार करणाऱ्या डॉ. रखमाबाई ह्या पहिल्याच महिला डॉक्टर. डॉक्टर होण्यापूर्वीच रखमाबाईंचे नाव येथे गाजले होते, ते त्यांच्या जीवनातील एका अपूर्व घटनेमुळे. रखमाबाईंचे बालवयात लग्न झाले होते; परंतु त्या आपल्या माहेरीच राहत होत्या. बुद्धीने, विचाराने रखमाबाई जसजशा प्रगल्भ होऊ लागल्या, त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेक अंगांनी फुलू लागले, तसतशी आपल्या नवऱ्यातील व स्वतःतील बौद्धिक दरी त्यांना जाणवू लागली. व्यसनी, अडाणी व परावलंबी पतीबरोबर संसार करणे या तेजस्वी स्त्रीला केवळ अशक्य होते. त्यांनी या लग्नाविरुद्ध बंड पुकारले. त्यांच्याभोवती एक प्रचंड वादळ निर्माण झाले. त्यांच्या पतीने त्यांच्याविरुद्ध खटला भरला. समाजाने विविध प्रकारचे आरोप रखमाबाईंवर केले. परंतु सर्व प्रकारचे मानसिक त्रास सोसूनही, त्या स्वत शी अप्रामाणिक झाल्या नाहीत. शेवटी त्यांच्या पतीनेच माघार घेतली. मोहिन
Author: Mohini Varde |
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
Publication Date: Jun 04, 1905 |
Number of Pages: 256 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8171852793 |
ISBN-13: 9788171852796 |