
Popular Prakashan Pvt Ltd
Drushya Nasalelya Drushyat
Product Code:
9788171855049
ISBN13:
9788171855049
Condition:
New
$18.37

Drushya Nasalelya Drushyat
$18.37
समकालीन कवितेपेक्षा दिनकर मनवर यांच्या कवितेचा 'स्वर' वेगळा आहे, तो एवढ्यासाठीच की मानवी अस्तित्वाच्या आदिम प्रेरणेतून आलेली भुकेची तीव्र जाणीव आणि व्यवस्थेकडून 'स्व' नाकारला जाण्याची दुखरी सल या कवितेतून अतिशय प्रभावीपणे प्रकट झाली आहे. ही संवेदना नव्वदोत्तर कवितेत अभावानेच आढळते. आजही माणसामाणसातले अंतर कमी झालेले नाही. माणसाचे जन्मसिद्ध हक्कही नव्या वेष्टणाखाली नाकारले जातात. 'वर्ग', 'वर्ण' जाणिवेचे रूपांतरण वेगवेगळ्या समूहात झाले आहे. समाजव्यवस्थेच्या उतरंडी नव्या चेहऱ्याने प्रकट होत आहेत. आजच्या समाजात वाढीस लागलेली ही विषमता बहुपदरी आहे. ती केवळ वर्ग, वर्ण जाणिवेतून आलेली नसून तिला जागतिकीकरणोत्तर काळाचे असे असंख्य पदर आहेत. पुराणकथा, मिथाकांच्या सर्जक वापरातून हे पदर उलगडून पाहण्याचा प्रयत्न ही कविता संयतपणे करते. एकार्थाने दीर्घ कथनातून व्यक्त झालेले हे आदिम भुकेचे स्वगत आहे. मानवी करुनेतून पाझरणारी आदिम प्रेरणा आणि उत्तर आधुनिक काळातील अस्तित्व परागंदा होण्याची भीती हे या कवितेचे मुख्य कथन आहे. कालौघात अदृश्य होत जाणारे माणसाचे असतेपण या कवितेचे मध्यवर्ती सूत्र असून त्यातून व्
Author: Dinkar Manwar |
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
Publication Date: Jan 01, 2014 |
Number of Pages: 138 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8171855040 |
ISBN-13: 9788171855049 |