Popular Prakashan Pvt Ltd
Zad-Zimbad
Product Code:
9788171855537
ISBN13:
9788171855537
Condition:
New
$21.13
Zad-Zimbad
$21.13
मराठी कथा-कादंबरी-कवितेत पाऊस आजवर हळुवार होऊन वावरत आलेला आहे. तो कधी सखा असतो, कधी प्रियकर, कधी पोशिंदा, कधी आईच्या दुग्धासारखा संजीवक, नवनिर्माणक्षम असतो. कृष्णात खोत यांच्या 'झडझिंबड' कादंबरीत पाऊस मात्र वेगळ्याच रौद्र रूपात भेटतो. पाऊस हाच कादंबरीचा नायक असणारी ही मराठीतली एकमेव कादंबरी आहे. पावसाची विविध रूपे इथे सहजपणे विकसित होत जातात. शेतकरी आणि पाऊस, खेडे आणि पाऊस यांचे असणारे अनोखे नातेबंध या कादंबरीत उलगडत जातात. झडीचा पाऊस येण्याआधी पावसाची आतुरतेने वाट पाहणारा गाव आणि झडीचा पाऊस सुरू झाल्यानंतर बेहाल झालेले गाव या कादंबरीत चित्रित झालेले आहे. पाऊस आपला स्वभाव बदलतो आहे याचे कारण आपण अपरिचित केलेली सृष्टीची हानी हे या काठेपाठीमागचे गर्भित सूचन आहे. अपरिमित उर्जेची नासाडी, निसर्गावर केलेला अनन्वित अत्याचार यांमुळे पाऊसही आपले रूप बदलतो आणि सुरू होतो झड-संताप. या झडीत गाव, माणूस, शेती, वृक्षवल्ली, जलचर, पाळीव प्राणी हे सारेच हतबल, अगतिक होऊन जातात आणि त्यांची दाणादाण उडून जाते. पाण्याचे, पावसाचे आणि माणसाचे नवे ताणतणावात्मक, उदध्वस्ततेकडे झुकलेले नातेबंध ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते. जागतिक
| Author: Krishnat Khot |
| Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
| Publication Date: Jan 01, 2012 |
| Number of Pages: 220 pages |
| Binding: Paperback or Softback |
| ISBN-10: 8171855539 |
| ISBN-13: 9788171855537 |