Popular Prakashan Pvt Ltd
Veez Mhanali Dhartila
Product Code:
9788171856459
ISBN13:
9788171856459
Condition:
New
$17.45
Veez Mhanali Dhartila
$17.45
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाने आणि जिद्दीने शिरवाडकरांसारखा प्रतिभावंत लेखक प्रभावित झाला नाही तर आश्चर्य. १८५७ साली पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील सहभाग आणि स्त्री-शक्तीचे दर्शन हे लक्ष्मीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन्ही पैलू लोभावणारे आहेत. इंग्रजांविरुद्ध हिंदुस्थानातील पहिला सशस्त्र उठाव १८५७ मधे झाला तेव्हा शस्त्रबळ कमी असूनही अनेक वीरांनी झुंज दिली. त्यांत लक्ष्मीबाई तर होत्याच शिवाय त्यांना साथ देणाऱ्या जुलेखासारख्या स्त्रियाही होत्या. जुलेखाने तर रणांगणावरही आपले कलाप्रेम सोडले नव्हते. निरनिराळे धर्म, अलगअलग सामाजिक स्तर यामधील स्त्रियांनी एकत्र येऊन लढा कसा चालू ठेवला याचे हृदयंगम चित्र ह्या नाटकात आढळते. त्यामुळे लक्ष्मीबाईइतकीच जुलेखा ही व्यक्तिरेखाही प्रभावी ठरते, मनाचा ठाव घेते. निव्वळ स्वातंत्र्यसंग्रामातील एक पान म्हणून न पाहता देशप्रेमाने प्रभावित झालेल्या ह्या स्त्रियांच्या व्यक्तिगत जीवनाकडेही शिरवाडकरांनी पाहिल्यामुळे या नाटकाला वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहे. स्वतः शिरवडकर या नाटकाचा, आपले सर्वात आवडते नाटक म्हणून, उल्लेख करीत असत. मुळा
| Author: V. V. Shirwadkar |
| Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
| Publication Date: May 23, 1905 |
| Number of Pages: 106 pages |
| Binding: Paperback or Softback |
| ISBN-10: 8171856454 |
| ISBN-13: 9788171856459 |