कुत्रे' हे विजय तेंडुलकरांचे सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी लिहिलेले नाटक. परंतु इतक्या वर्षांनंतरही ते कालबाह्य वाटत नाही. कारण तत्कालीन परिस्थितीपेक्षा तेंडुलकरांच्या नाटकांमधून मानवी वृत्ती-प्रवृत्तींना असलेले महत्त्व. 'कुत्रे'मध्येही तथाकथित सभ्य आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या भ्याड, षंढ मनोवृत्तीचे अतिशय बोचरे चित्रण तेंडुलकरांनी केले आहे. लोकनाट्याचा बाज असलेल्या या नाटकात नेपथ्याऐवजी वातावरणनिर्मिती करणाऱ्या स्लाइड्स वापरून एक नवे तंत्र तेंडुलकरांनी विकसित केलेले दिसते. मराठी रंगभूमीला आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने नवीन काही देणारे हे नाटक आहे.
| Author: Vijay Tendulkar |
| Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
| Publication Date: Jun 25, 1905 |
| Number of Pages: 94 pages |
| Binding: Paperback or Softback |
| ISBN-10: 8171857833 |
| ISBN-13: 9788171857838 |