तरुण नरेंद्र आणि तरुण दीपिका प्रेमात पडतात. नरेंद्र दीपिकाच्या अनवट प्रेमाने मोहित असतो आणि त्याला मधूनमधून प्रेमात दीपिकाच व्हिलन वाटते. दोघांचे लग्न होते. "आपल्यासारखा मधुचंद्र सर्व तरुणतरुणींचा व्हायला हवा. आपण तरुणतरुणींची मधुचंद्रासंदर्भात शिबिरे घ्यायला हवीत," असे नरेंद्र म्हणतो. खूप खूप नंतर तृप्त जीवन जगलेले नरेंद्रजी आणि दीपिकाजी... नरेंद्र आणि दीपिकाजी दुसरा मधुचंद्र साजरा करतात. परिस्थिती असे वळण घेते की नरेंद्रजी दीपिकाजींवर गोळी झाडतात... तरुणपणापासून दीपिकाजी शोधत असतात. अखेरीस त्यांना ते सापडतेही. श्याम मनोहरांची अशी ठाम धारणा आहे की, सद्यःकालीन व्यापक सामाजिक स्थितिप्रियतेच्या मुळाशी माध्यम वर्गाची बुद्धिविरोधी वृत्ती आहे. आमच्या समाजजीवनाला वैज्ञानिक पाया नाही. आम्हाला ज्ञानप्राप्तीची खरी ओढच नाही. माहितीच्या क्रांतीत मग्न असलेला आजचा समाज ज्ञानसमाजाच्या आदर्शापासून दुरावत चालला आहे. आम्ही कोरडे विचार खूप गिरवले, तत्त्ववैचारिक उसनवारीही उदंड केली; पण ज्ञान संपादन करून सुधारणा किंवा चळवळी केल्या नाहीत... श्याम मनोहरांच्या साहित्याचे पडसाद दीर्घ काळ उठत राहणे अटळ आहे.
| Author: Shyam Manohar |
| Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
| Publication Date: Jan 01, 2018 |
| Number of Pages: 290 pages |
| Binding: Paperback or Softback |
| ISBN-10: 817991917X |
| ISBN-13: 9788179919170 |