
Popular Prakashan Pvt. Ltd.
Hippocrateschi Shapath (हिपोक्रॅटिसची शपथ)

Hippocrateschi Shapath (हिपोक्रॅटिसची शपथ)
भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांत वैद्यकाचा इतिहास आवर्जून शिकवला जातोच असे नाही. या विषयावर भारतात फारच कमी लिखाण झाले आहे. मराठीतही काही लेखकांनी स्फुट स्वरूपाचे लेखन केले आहे. वैद्यकीय अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या विषयावर डॉ. चंद्रकांत वागळे यांनी बराच अभ्यास करून 'वैद्यकाची यशोगाथा' आणि 'आत्मा ते जनुक' ही दोन पुस्तके लिहिली. 'हिपोक्रॅटिसची शपथ' या पुस्तकात वैद्यकातील महत्त्वाचे चर्चाविषय आणि अजरामर संशोधनकार्य करूनही प्रकाशझोतात नसलेल्या पाश्चात्त्य आणि काही भारतीय संशोधकांची ओळख डॉ. वागळे यांनी करून दिली आहे.
वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरचे वर्तन कसे असावे याबद्दल प्रत्येक वैद्यकप्रणालीतील पूर्वसुरींनी काही नीतिनियम, बंधने, काही सूचना आपल्या लेखनातून मांडल्या आहेत. चरक, सुश्रुत या भारतीय आचार्यांनी आपापल्या संहितांमध्ये तर ग्रीसमधल्या हिपोक्रॅटिस या रोगोपचारकाने वैद्यक व्यावसायिकांनी पाळावयाची आचारसंहिता स्पष्टपणे नोंदवून ठेवली आहे. विशेषतः वैद्यकीय व्यावसायिकांना नीतिमत्तेची जाणीव करून देऊन वैद्यकाला उदात्त पातळीवर नेण्याचे कार्य हिपोक्रॅटिì
Author: Chandrakant Shankar Wagle |
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. |
Publication Date: Jan 01, 2019 |
Number of Pages: 146 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8179919609 |
ISBN-13: 9788179919606 |