
Popular Prakashan Pvt Ltd
Local Te Global
Product Code:
9788179919699
ISBN13:
9788179919699
Condition:
New
$21.13

Local Te Global
$21.13
गाववाड्याबाबत लिहिताना शोषित वर्गातील लिहिणारा वेगळ्या दृष्टिकोणातून लिहितो तर, शेतीभातीत कुणबाव्यात जगले्ला वेगळ्याच दृष्टिकोणातून आपली मते प्रदर्शित करतो. कोणाला खेडे हे फक्त शोषणाचे केंद्र वाटते, तर कोणास समूहभावाने जगणारे ममताळू गाव वाटते. या सगळ्यांच्या दृष्टिकोणातून खेडे वाचणाऱ्याला नेहमीच वेगवेगळे वाटत असते.खेड्याबाबतची मतमतांतरे, दावे, प्रतिदावे सततच केले जाणार आहेत. गाववाड्याच्या नेमक्या विश्लेषणाला याची मदतच होणार आहे. गावगाडा मुळात आकाराला येतो तो कृषिव्यवस्थेतून. जमिनीची विभागणी काळी आणि पांढरी अशी केली जाते. काळी कसण्यासाठी आणि पांढरी बसण्यासाठी अशी समजूत पूर्वापार चालत आलेली आहे. मुबलक काळी उपजाऊ जमीन असेल तिथे सापडणाऱ्या पांढऱ्या तुकड्यावर गाव वसत जाते. काळी-पंढरीबरोबरच पाण्याची उपलब्धता हीही गाव बसण्यासाठी आवश्यक बाब असते. अशा पांढरीवर वसती करणाऱ्या प्रत्येकाच्या जगण्यात श्रम हे केंद्रभागी होते. या श्रमातूनच कृषिजन संस्कृती विकसित होत गेलेली दिसते. या कृषिजन संस्कृतीच्या पोटात अनेक गावगाडे सामावलेले दिसतात. आणि या गावगाड्यात माणसांबरोबरच पशुपक्षी, झाडेझुडप
Author: Rajan Gavas |
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
Publication Date: Jul 11, 1905 |
Number of Pages: 208 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8179919692 |
ISBN-13: 9788179919699 |