विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देश संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात या वर्षी भाषेतल्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी. 'मॅडम रोझेला आणि पेलीन' ही कहाणी आहे दोन स्त्रियांची. वंशाने सेफार्मिक ज्यू असलेली अठ्ठ्यायशी वर्षांची रोझेला आणि इस्तंबूलची धर्मान मुस्लीम असलेली विशीतली पेलीन यांच्यातील संवादांतून ही कादंबरी उलगडत जाते. हिटलरच्या अत्याचारांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊनही रोझेलाची प्रेमावर श्रद्धा आहे. तर तरुण पेलीनच्या मते प्रेम हे एक थोतांड आहे. या अनेक दृष्टीनी असलेल्या स्त्रिया यांना एकत्र आणणारे धागे म्हणजे इस्तंबूल आणि तुर्की भाषा. रोझेला आपल्या व्यक्तित्वाचे श्रेय या दोहोंना देते. पेलीनच्या दृष्टीने तर इस्तंबूल ही मायभूमी आणि तुर्की ही मायबोली आहे. अत्याधुनिक अशा युरोपियन शहरातलं वास्तव्य ही तिला दिलेली सजा आहे. या दोघींमधला आणखी एक समान घटक म्हणजे
Author: Tuna Kiremitci |
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
Publication Date: Jan 01, 2022 |
Number of Pages: 176 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8179919986 |
ISBN-13: 9788179919989 |