
Wow Publishings
Ishwar Kon Mi Kon - Aatmsakshatkaracha Marga (Marathi)

Ishwar Kon Mi Kon - Aatmsakshatkaracha Marga (Marathi)
'मी कोण आहे...?' युगानुयुगांपासून मनुष्याला पडलेला प्रश्न! मनुष्य स्वतःला कधी शरीर मानतो, तर कधी मन. शिवाय एखादी नवकल्पना स्फुरताच तो म्हणतो, 'मी विचार केला.' म्हणजेच यावेळी तो स्वतःला बुद्धी मानत असतो. थोडक्यात, त्याच्या जाणिवांचं विश्व शरीर-मन-बुद्धीपुरतंच सीमित असतं. मग स्वतःच्याच संकुचित वृत्तीत अडकलेला मनुष्य सर्वोच्च आनंदाप्रत कसा बरं पोहोचू शकेल? तेच लोक या आनंदाचे धनी होऊ शकतात, जे स्व-चौकशीच्या आधारे स्वतःच्या असली अस्तित्वाचा प्रामाणिकपणे शोध घेतात. स्व-चौकशीच्या मार्गावर चालणारा मनुष्य मोहमायेचा भवसागर सहजतया पार करू शकतो. कारण त्याच्या अंतर्यामी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव प्रखर होऊ लागते, एक शाश्वत सत्य त्याच्या मनात वास्तव्य करू लागतं. या अवस्थेला कोणी 'आत्मसाक्षात्कार', कोणी 'मोक्ष', 'मुक्ती', 'समाधी', 'निर्वाण', तर कोणी 'कैवल्य' म्हणतात. आपणही या सर्वोच्च अवस्थेत स्थापित व्हावं, यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न म्हणजे प्रस्तुत पुस्तक. आध्यात्मिक विश्वातील नवक्रांतीचा अनुभव घेण्यासाठी या पुस्तकाचा प्रत्येक सत्यप्रेमीने लाभ घ्यायलाच हवा.
Author: Sirshree |
Publisher: Wow Publishings |
Publication Date: Jan 01, 2015 |
Number of Pages: 146 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8184154046 |
ISBN-13: 9788184154047 |