
Wow Publishings
Mrutyu Anta Navhe Vatchal... - Partoocha Rahasya (Marathi)

Mrutyu Anta Navhe Vatchal... - Partoocha Rahasya (Marathi)
पृथ्वीवर माणसाचं वास्तव्य म्हणजे एखाद्या विद्यालयात प्रवेश घेऊन अध्ययन करण्यासारखंच नव्हे का? हे जग म्हणजे एक विद्यालय... प्रत्येक जीव पृथ्वीवर येतो ते काहीतरी उद्दिष्ट घेऊनच... कोणी धैर्य शिकण्यासाठी येथे येतो तर कोणी तेजप्रेमाची अनुभूती मिळावी म्हणून... काही लोक द्वेष-मत्सराचे परिणाम जाणून घेण्यासाठी तर काही निर्भय होण्यासाठी. प्रत्येकासाठी येथे स्वतंत्र अभ्यासक्रम असून जीवन जगता-जगता यातील धडे आत्मसात करायचे असतात... परंतु नेमकं हेच विसरल्यामुळे माणूस निरर्थक गोष्टींमध्ये आपला वेळ दवडतो. भावी पिढींसाठी कोणता वारसा सोडायचा? किती लोकांना आपण मनापासून मदत करतो? आपल्या मृत्यूनंतर किती लोकांना दुःख होईल? यांवर मनन न केल्याने जीवनालाच धडा शिकवण्याची संधी मिळते... पण तोपर्यंत माणसाचं अर्धं आयुष्य संपलेलं असतं. सुप्त गुणांना वाव न देता विकसित होण्यापूर्वीच चिरडून टाकणं हीच खरी आपल्या जीवनाची शोकांतिका... वास्तविक "मृत्यू' हा माणसाच्या जीवनप्रवासाचा अंत नसून "महाजीवनाकडे' नेणारं प्रवेशद्वार आहे. मृत्यूविषयीचं ज्ञान माणसाला सकारात्मक आणि सुंदर बनवतं. म्हणून मृत्यूचं भय न बाळगता या जीवनातच जागृत झाल
Author: Sirshree |
Publisher: Wow Publishings |
Publication Date: Jan 01, 2016 |
Number of Pages: 186 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8184154453 |
ISBN-13: 9788184154450 |