
Wow Publishings
Mukti Series: Bhay Mukti - Sahasi Jeevan Kasa Jagal (Marathi)

Mukti Series: Bhay Mukti - Sahasi Jeevan Kasa Jagal (Marathi)
भितीला करा कायमचा बाय-बाय
यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे "भय'! यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये एक मुख्य फरक आढळतो. तो म्हणजे, यशस्वी लोक भयमुक्त असतात, तर अयशस्वी लोक भीतीचा सामनाच करू शकत नाहीत. मग ती परीक्षा असो वा जीवनातील कोणताही कठीण प्रसंग, स्टेजवर बोलण्याचा प्रसंग असो किंवा संकटांना सामोरं जाण्याची वेळ, जोखीम पत्करण्याची, नवं पाऊल उचलण्याची संधी असो अथवा मृत्यूला सामोरं जाण्याचा क्षण... अशा सर्व घटनांना मनुष्य तेव्हाच तोंड देऊ शकतो, जेव्हा त्यानं मनातील भीतीवर मात केलेली असते.
प्रस्तुत पुस्तकाच्या प्रत्येक पानावर तुम्हाला भयमुक्तीचे उपाय गवसतील. या पुस्तकातील ज्ञान प्राप्त केल्यावर तुम्ही कोणतीही परिस्थिती हाताळू शकाल. इतकंच नव्हे, तर आव्हानांना सामोरं जाताना तुम्ही मुळीच डगमगणार नाही. कारण आता तुमच्यासोबत असेल, संकटांना भिडण्याची वृत्ती, आत्मविश्वासाची शक्ती आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी धडाडी!
Author: Sirshree |
Publisher: Wow Publishings |
Publication Date: Jan 01, 2016 |
Number of Pages: 66 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8184154828 |
ISBN-13: 9788184154825 |