
Wow Publishings
Kshamechi Jaadu - Kshamecha Samarthya Jana, Sarv Dukhanpasun Mukt Vha (Marathi)

Kshamechi Jaadu - Kshamecha Samarthya Jana, Sarv Dukhanpasun Mukt Vha (Marathi)
क्षमा मागून अंतःकरण शुद्ध (इन-साफ) करण्याची कला तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? तुम्हाला सदैव आनंदी राहायचं आहे का? तुमचे कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक नातेसंबंध मधुर आणि दृढ करायचे आहेत का? तुम्हाला जीवनात यशाचं शिखर गाठायचं आहे का? या सर्व प्रश्]नांची उत्तरं होकारार्थी असतील, तर तुम्हाला केवळ एकच शब्द म्हणायला शिकायचं आहे तो म्हणजे 'सॉरी' 'मला माफ करा.' सॉरी, क्षमा, माफी... शब्द कोणतेही असो, मनःपूर्वक माफी मागितल्याने जीवनात चमत्कार घडू लागतात, तुमचं अंतःकरण (इन-साफ) शुद्ध, स्वच्छ होतं. एवढंच नव्हे, तर तुमची मागील सर्व कर्मबंधनं नष्ट होऊन, भाग्योदय होतो. प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपण हीच क्षमेची जादू शिकणार आहोत. यात आपण शिकाल- - क्षमेद्वारे सुख-दुःखाच्या पल्याड जाऊन, आनंदी कसं राहाल - विकारातून मुक्त होण्यासाठी काय कराल - आपली सर्व कर्मबंधनं, क्षमेद्वारे कशी नष्ट कराल - आपल्या शरीराच्या अवयवांची क्षमा मागून, उत्तम स्वास्थ्य कसं प्राप्त कराल - इतरांना का आणि कशा प्रकारे माफ करून, स्वतःवर प्रेम कराल - क्षमेद्वारे मोक्षमापर्यंतचं अंतिम यश कसं प्राप्त कराल
Author: Sirshree |
Publisher: Wow Publishings |
Publication Date: Jan 01, 2017 |
Number of Pages: 178 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8184155808 |
ISBN-13: 9788184155808 |