
Mehta Publishing House
Agnidivya
Product Code:
9788184989106
ISBN13:
9788184989106
Condition:
New
$27.56

Agnidivya
$27.56
हिंदवी स्वराज्याचे सरनौबत नेताजी पालकर यांचे मोगलांना सामील होणे, दुर्दैवाने धर्मांतरित होणे आणि प्रदीर्घ काळानंतर परत येणे; महाराजांनी त्यांना कौल देणे व शुद्ध करवून हिंदू धर्मात परत घेणे वगैरे मराठा इतिहासातील घटना अचानक किंवा दैवदुर्विलासाने घडून आलेल्या दु खद घटना नाहीत तर महाराजांनी गनिमी काव्याच्या राजकारणाचा एक भाग म्हणून खेळलेल्या एका धाडसी डावपेचाचा आणि सतत सावध राहून धूर्त, चपळ राजकीय खेळी करणाऱ्या औरंगजेब बादशहामुळे फसलेल्या व अंगलट आलेल्या राजकारणाचा अनिवार्य परिपाक होता असा श्रीकल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ठाम विश्वास आहे. अनेक गुप्त मसलतींचे पुरावे कागदोपत्री नोंदवले जात नाहीत; त्यामुळे त्यांचा धांडोळा कागदपत्रांमध्ये घेणे शक्य नसते. परिस्थितीजन्य संदर्भ, पुसटसे उल्लेख व सूचक सूत्रे यांच्या मदतीने तर्कावर आधारित कल्पनेतून अशा मसलतींचा उलगडा करता येतो. इतिहासाचे लेखक अत्यंत क्लिष्ट व महत्त्वाच्या घटना किंवा प्रदीर्घ कालखंड केवळ एक-दोन वाक्यांमध्ये सांगतात पण त्या प्रसंगामध्ये अनेकांचे अपार कष्ट, भाव-भावना, इतकेच नव्हे तर आयुष्ये गुंतलेली असतात. उपलब्ध तुटपुंज्य
Author: Bennurwar Kalyaniraman |
Publisher: Mehta Publishing House |
Publication Date: Dec 11, 2015 |
Number of Pages: 470 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8184989105 |
ISBN-13: 9788184989106 |