
Blue Rose Publishers
माझा शैक्षणिक प्रवास

माझा शैक्षणिक प्रवास
माझ्या शैक्षणिक जीवनाचा प्रवास या ठिकाणी मांडत असताना मी या ठिकाणी माझ्या आयुष्यातील घडलेल्या घडामोडींचा आलेख रुपी आढावा अगदी प्राथमिक शिक्षण म्हणजे बालपणापासून ते उच्च शिक्षण म्हणजे पी.एच. डी . शिक्षणापर्यंतचा माझा वैयक्तिक अनुभव मला आठवेल तसा या ठिकाणी लिहिण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे. माझ्यावर बालपणापासून संस्कार करणारे आमचे शिक्षकवृंद, आमचे आई पप्पा, आबा (आजोबा), आज्जी, तात्या (आजोबांचे मोठे भाऊ), आमचे बापू (भास्कर बापू), आमचे दादा( देवी डॉक्टर),आमच्या थोरल्या आई, आमचे मोठे भाऊ, मिलिंद अप्पा, आमची आशा ताई, माझे मोठे दादा (महानंद दादा आणि प्रशांत दादा), आमचे सर्व नातेवाईक, माझी सहचारिणी आणि अपत्ये, आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, माझे सर्व मित्र मैत्रिणी,माझे सर्व दादा आणि ताई अक्का लोकं माझ्या मित्र मैत्रिणींचे आई वडील या सर्व लोकांच्या मार्गदर्शनातून मी माझा हा प्रवास पूर्ण केलेला आहे. एखादा व्यक्ती घडण्यामागे अशा असंख्य ज्ञात आणि अज्ञात लोकांचा सहभाग असतो. मी हा प्रवास पूर्ण कारण्यापाठीमागे माझी जरी इच्छा शक्ती असली तरीही माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व लोकांचा वेळोवेळी असणारा खंबीर पाठिम्बा आ
Author: डॉ. शरद |
Publisher: Blue Rose Publishers |
Publication Date: Mar 14, 2024 |
Number of Pages: 104 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 9358199261 |
ISBN-13: 9789358199260 |