Mehta Publishing House
He Adima, He Antima
Product Code:
9789386175410
ISBN13:
9789386175410
Condition:
New
$21.13
He Adima, He Antima
$21.13
या कादंबरीत चार पिढ्यांची कहाणी सांगितलेली आहे. हिमोफिलिया हा भयंकर रक्तदोषाचा आजार रमा, सुधा, अंजली या तीन वाहक स्त्रियांद्वारा पुढल्या पिढीकडे संक्रमित झाला आहे. आपल्या समाजातील एका संपन्न घराण्याची ही प्रातिनिधिक कहाणी आहे. या स्त्रिया या आजाराविषयी अनभिज्ञ आहेत. आपल्या लाडक्या मुलांच्या भयानक वेदनामय, दुःखी जीवनासाठी आपण कारणीभूत आहोत,या वास्तवाची त्यांना पुसटशी कल्पनाही नाही. श्रुतीच्या मातुल घराण्याच्या तीन पिढ्यांच्या तीन स्त्री-प्रतिनिधींची ही कथा आहे. 'हिमोफिलिया' नामक रोगाने, महाराक्षसाने, त्यांचे सुख-चैन खाऊन टाकले. पहिल्या दोन पिढ्या तर या भयंकर व्याधीविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होत्या. श्रुतीच्या आईची- अंजलीची प्रथम या वास्तवाशी ओळख झाली. त्याच वेळी तिच्या आजीलाही हे भयंकर कटू सत्य कळले आणि ती कोसळलीच! 'हिमोफिलिया' हा जरी या कथनाचा मुख्य विषय असला, तरी त्या अनुषंगाने प्रत्येक पिढीच्या, कालप्रवाहाच्या ओघात बदलणाNया सामाजिक, आर्थिक, भौतिक, मानसिक वातावरणाशीही वाचकांची ओळख व्हावी, त्या काळातसुद्धा, गाव आणि शहरी जीवनातील राहणी, सुखसोयींतला फरक कळावा, अशी लेखिकेची मनापासून इच्छा होती. म्हण&
| Author: Dhobale Suvarna |
| Publisher: Mehta Publishing House |
| Publication Date: 42674 |
| Number of Pages: 298 pages |
| Binding: Fiction |
| ISBN-10: 938617541X |
| ISBN-13: 9789386175410 |