
StoryMirror Infotech Pvt Ltd
गुंफण नात्यांची (Gumphan Natyanchi)

गुंफण नात्यांची (Gumphan Natyanchi)
About the Book:
आयुष्य जगताना जोडली जातात अनेक नाती-गोती...
काळाच्या प्रवाहात वाहत जातात त्यातली कित्येक नाती...
पैशामागे धावताना माणूस विसरतो रक्ताची नाती...
नव ते हवं या प्रमाणे नवीन नाती जपताना जुनी नाती मात्र हळूच निसटून जाती...
कोण आपले, कोण परके ना कोणास कळती...
टिकून राहती तीच नाती जे करीती खोटी स्तुती...
भल्या गर्दीत पडे एकटा ज्यास न जमली ही कॄती...
जुन्या आठवांच्या स्मॄतीमध्येच काहीजण रमून जाती...
तर काही मात्र नव्या नात्याच्या मागे मागे धावती...
कोणी नाही कोणाचे हे जरी असले खरे...
तरी मन हे वेडे मात्र उगाच अपेक्षा करते का बरे?
भंग होता त्या अपेक्षांचा, नकळत ओल्या होतात कडा...
तुटलेल्या या नात्यातून माणूस मात्र नक्कीच शिकतो एक धडा...
असली जरी रक्ताची नाती तरी लोकं मात्र पैसा असे त्यालाच पुसती...
पैसा आणि स्टेटस जपणारी दिखाऊ नाती...
ह्या साऱ्या मधून हरवून जाती खरी अनमोल नाती...
आपले आयुष्य म्हणजे अनेक नात्यांच्या कडू-गोड आठवणींचे मिश्र लोणचं असते...या लोणच्यात आवश्यक असतो तो शब्दांचा खार...तो नेहमी जपून वापरावा लागतो, कारण जास्त प्रमाणात झाला तर आयुष्यातील नात्यांचं लोणचं खराब होतं...कमी प्रमाणì
Author: Anuja Ketan Sheth |
Publisher: Storymirror Infotech Pvt Ltd |
Publication Date: Oct 31, 2022 |
Number of Pages: 170 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 9395374012 |
ISBN-13: 9789395374019 |